WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल
WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल झालाय.

WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल झालाय. येत्या 29 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, टी-20 हे सर्व खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमारसह अन्य खेळाडू त्रिनादादच्या विमानतळावर दिसले.महत्वाचं म्हणजे, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखरेचा एकदिवसीय सामना उद्या खेळला जाणार आहे. त्यानंतर 29 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होईल. दरम्यान, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं दुसरा एकदिवसीय सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केलाय.
भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
