CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकण्याचा भाविना पटेलचा आत्मविश्वास
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धा खेळण्यासाठी भारताची पॅरा टेबल महिला टेनिसपटू भाविना पटेल (Bhavina Patel) बर्मिंगहॅम येथे दाखल झालीय.
![CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकण्याचा भाविना पटेलचा आत्मविश्वास Commonwealth Games 2022: Para TT player Bhavina Patel confident of winning medal at CWG 2022 CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकण्याचा भाविना पटेलचा आत्मविश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/80bc14dfcca48e457ac068c5a6dfa30b1658810771_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धा खेळण्यासाठी भारताची पॅरा टेबल महिला टेनिसपटू भाविना पटेल (Bhavina Patel) बर्मिंगहॅम येथे दाखल झालीय. या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याबाबत तिला आत्मविश्वास आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पॅरा टेबल टेनिस तुकडी रविवारी बर्मिंगहॅमला पोहोचली आहे.
टोकियो पॅरालिम्पिक भाविना पटेलनं भारतासाठी रौप्यपदक जिंकलं होतं. या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भाविनाला चीनच्या झोउ यिंगकडून 3-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.
भाविना पटेल काय म्हणाली?
कॉमनवेल्थ स्पर्धा खेळण्यासाठी बर्मिंगहॅम येथे पोहचलेल्या भाविना पटेल म्हणाली की, "लोक माझ्याकडून पदकांची अपेक्षा करत आहेत, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी नेहमीच कोणताही दबावाखाली न राहता माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय. ज्यावेळी तुम्ही दबावात खेळतात, तेव्हा तुमच्या खेळावर परिणाम होतो", असं तिनं एएनआयशी बोलताना म्हटलंय.
कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज अरंविद उस्तुक
राज अरंविद पहिल्यांदात कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास राज अरंविदनं व्यक्त केलाय. "एक खेळाडू म्हणून ही माझी पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा आहे. या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी मी गेल्या 6-8 महिन्यांपासून तयारी करत आहे. आमच्याकडे भाविना पटेल आहेत. पॅरालिम्पिकमधील ती रौप्यपदक विजेती आहे. आम्ही भारतासाठी पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत", असं राज अरविंदनं म्हटलंय.
हे देखील वाचा-
- Chahal's Iconic Pose Viral : भारताचा दमदार विजय, मालिकाही खिशात, विजयानंतर अक्षर-आवेशचं खास 'चहल स्टाईल' सेलिब्रेशन
- Shreyas Iyer : श्रेयस अय्यरनं अफलातून झेल पकडत केलं खास सेलिब्रेशन, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?
- IND vs WI : 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर सिराजच्या वक्तव्यानं जिंकली मनं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)