(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Olympic 2020 :तिरंदाजीत प्रविण जाधवचा संघर्ष कौतुकास्पद,मनू भाकर-सौरभ चौधरीकडून उद्या पदकाची अपेक्षा
India Schedule, Tokyo Olympic 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी काही खास नव्हता. भारताची स्टार टेबल टेनिसपटू मानिका बत्रा आणि सुतीर्थ मुखर्जी या महिला एकेरीत सरळ गेममध्ये पराभूत झाल्या. मात्र शरथ कमल तिसर्या फेरीत पोहोचला आणि आता शरथकडूनच पदक मिळण्याची एकमेव आशा आहे. भारतीय खेळाडूंनी अन्य खेळांमध्येही निराश केले. पाचव्या दिवशी प्रत्येकाला शरथ कमल आणि मनु भाकरकडून पदकाची आशा असेल. भारतीय वेळेनुसार मंगळवारी (27 जुलै) टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.
नेमबाजी
सकाळी 5.30 वाजता एअर पिस्टल मिश्र टीम क्वॉलिफिकेशन पहिली फेरी सुरु होईल. यात सौरभ चौधरी आणि मनु भाकर, यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश असेल.
तर सकाळी 10 वाजता एअर रायफल मिश्र टीम क्वॉलिफिकेशन पहिली फेरी सुरु होईल. यात इलाव्हेनिल वलारिवन आणि दिव्यांशसिंग पंवार, अंजुम मुद्गिल आणि दीपक कुमार हे खेळतील