Ashish Shelar BCCI : बीसीसीआयमध्ये आशिष शेलार एमसीएचं प्रतिनिधित्व करणार?
भाजपचे नेते आशिष शेलार बीसीसीआयचे उपाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या अगामी एजीएम आणि त्रेवार्षिक निवडणुकीत शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणार आहेत. एमसीएच्या काल झालेल्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आगामी निवडणुकीत अध्यक्षपदावर बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं खबरदारीची उपाययोजना म्हणून आशिष शेलार यांना एमसीएचं प्रतिनिधित्व देण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर शेलार यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी किंवा कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर निवड होण्याची शक्यता आहे. शेलार यांची एमसीएनं एकमतानं केलेली निवड म्हणजे शरद पवार यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालंय.























