Israel Hamas War Updates : इस्त्रायल आणि हमासमध्ये अखेर शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून शस्त्रसंधी
Israel Hamas War Updates : इस्त्रायल आणि हमासमध्ये अखेर शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून शस्त्रसंधी
इस्रायल आणि हमासमध्ये अखेर शस्त्रसंधी झाली आहे. शुक्रवारी सकाळी सातपासून शस्त्रसंधी अमलात येईल, अशी माहिती मध्यस्थी करणाऱ्यांपैकी एक देश असलेल्या कतारनं दिली आहे. शस्त्रसंधी कराराचा भाग म्हणून हमासकडून ४० इस्रायली नागरिकांची सुटका केली जाईल, तर इस्रायलकडून १५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात येईल. तसंच, अन्नधान्य आणि औषध वाहून नेणारे ३०० ट्रक पॅलेस्टाईनमध्ये पाठवण्यात येणार आहेत, कारण युद्ध सुरू झाल्यापासून पॅलेस्टाईनमध्ये अन्न, इंधन आणि वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनं, प्रचंड वाटाघाटी करून हा शस्त्रसंधी करार अस्तित्वात आला. आता दोन्हीही बाजूंकडून त्याचं तंतोतंत पालन होतं का ते पाहावं लागेल.























