Wardha : वर्धा जिल्ह्यात देवळी एपीएमसीत शेतकरी - व्यापारी वाद पेटला ABP Majha
Wardha : वर्धा जिल्ह्यात देवळी एपीएमसीत शेतकरी - व्यापारी वाद पेटला ABP Majha
सरकारने कापसाचे हमीभाव ठरवून दिले असतानाही खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होतेय. व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला गेलाय. त्यामुळे देवळी येथील कृषी उत्पन्न समितीच्या यार्डात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शाब्दिक वाद उफाळला होता. काही काळ लिलाव बंद राहिले, व्यापाऱ्यांची अडचण निर्माण होत असल्याने अवाक जास्त झाल्याचे कारण सांगून दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. मात्र व्यापाऱ्यांचा हमीभावत खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करणे या शासनाच्या भूमिकेला विरोध आहे. देवळी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अवाक जास्त झाल्याने माल ठेवायला जागा नसल्याचे कारण समोर करण्यात येऊन बाजार समिती दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे हेच चित्र जिल्ह्यात देखील आहे.