V L Bhave Oil Painting: वि ल भावे यांच्या तैलचित्राचं अनावरण, सुहास बहुळकरांच्या पुस्तकाचंही प्रकाशन
ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांच्या तैलचित्राचे अनावरण काल झालं. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी लिहीलेल्या 'कलेतील भारतीयत्वाची चळवळ - द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कला अभ्यासक दिलीप रानडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भावे यांचे नातू अनिकेत भावे, अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्याध्यक्ष विनायक गोखले, विश्वस्त ॲड. मकरंद रेगे, उपसंचालक प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. डॉ. सदानंद मोरे यांनी वि. ल. भावे यांच्या कार्याचा गौरव केला.






















