Kalyan Thane Robbery : दोन दुकानांना भगदाड पाडून सोन्याची लूट, कल्याणमधील घटना
Kalyan Thane Robbery : दोन दुकानांना भगदाड पाडून सोन्याची लूट, कल्याणमधील घटना
कल्याणमध्ये चोरांनी ज्वेलर्सचं दुकान लुटण्यासाठी वेगळीच शक्कल लढवल्याचं समोर आलंय. चोरांनी तीन दुकानांच्या दोन भितींना भगदाड पाडलं. चोरीच्या या प्रकारामुळे पोलीसही चक्रावलेत. कल्याणमधील बिर्ला कॉलेज परिसरातील ही घटना आहे. कटर मशीनचा गॅस अचानक बंद झाल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे मुख्य लॉकर तोडू शकले नाही. मात्र दुकानाच्या शोकेसमधील दागिने घेऊन पसार झाले. काही दिवसांपूर्वी ज्वेलर्सच्या शेजारी दोन दुकाने सोडून काही तरुणांनी मोबाईल शॉप सुूु करण्यासाठी एक गाळा भाड्याने घेतला होता. या तरुणांकडून ही दुकानफोडी केली असल्याचे सांगितले जातंय. दरम्यान, खडकपाडा पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.























