CM Eknath Shinde यांच्या हस्ते घरकुलाचं चावी वाटप, प्रबोधनकार ठाकरे तलावाचं लोकार्पण
CM Eknath Shinde यांच्या हस्ते घरकुलाचं चावी वाटप, प्रबोधनकार ठाकरे तलावाचं लोकार्पण
कल्याणमधल्या प्रबोधनकार ठाकरे तलावाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत या तलावाचं सुशोभिकरण करण्यात आलं आहे. याच परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारकही उभारण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकामांचं लोकार्पण आणि विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांना घरकुलांच्या चावी वाटप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अमृत अभियानअंतर्गत मौजे वाघेघर आणि मौजे आंबिवली येथील मलशुध्दीकरण केंद्राचं उद्घाटनही या कार्यक्रमात करण्यात आलं. तसंच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील दोन डायलिसिस सेंटरचा लोकार्पणही या कार्यक्रमात करण्यात आलं.























