Waghanakha Satara : इंग्लंडहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात
Waghanakha Satara : इंग्लंडहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivajia Maharaj) ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं (Wagh Nakh) अखेर साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल. यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डीडी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तर या वाघनखांना देशात आणण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मात्र राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. सोबतच आपण देखील ही वाघनखं बघण्यासाठी साताऱ्याला जाणार असल्याची देखील तयारी दाखवली आहे.