(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Krishna River :सांगली जिल्हा प्रशासनाकडून कृष्णेच्या पात्रात सुरक्षेबाबत मॉकड्रील
कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली होती. परंतु पावसाचा जोर कमी असल्याने आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ४०.११ इंचांवर स्थिर होती. शनिवारी रात्रीपासून पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. पुलाजवळ कृष्णेची पातळी ३९ फूट १० इंच आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळी हळूहळू कमी होऊ लागल्याने पुराची भीती कमी झाली आहे.
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटाच्या आसपास स्थिर आहे. तरीही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून नदीत सुरक्षेबाबत मॉकड्रील घेण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगलीच्या सरकारी घाटापासून ते मिरच्या अर्जुनवाड पुलापर्यंत नदीपात्रात सुरक्षा मॉकड्रिल घेण्यात आले. यामध्ये जिल्हा प्रशासन महापालिका पोलीस आणि लष्कराचे जवान यांनी सहभाग घेतला होता.