Ratnagiri Mango : हवामान बदलांंमुळे आंबा बागायतदार हैराण, तुडतुडे आणि थ्रीप्सच्या आंब्यावर परिणाम
सतत होणाऱ्या हवामान बदलांंमुळे बागायतदार हैराण झालेत.. या बदलांमुळे आंब्याच्या उत्पादकतेवर परिणाम होतोय.. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव दिसतोय. त्यामुळे बागायतदारांना कीटकनाशक फवारणी करावी लागतेय.. पावसाचा मुक्काम यंदा दिवाळीपर्यंत होता. परिणामी 90 टक्के झाडांना पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडे मोहराकडे वर्ग होत आहेत. दिवसा ऊन, रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झालाय.. कीटकनाशकांची फवारणी करून दोन्ही कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हापूसचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी पालवीवरील थ्रीप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.























