Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
रायगडच्या अलिबागमध्ये खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. बंधारा बांधण्याच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय. या घोटाळ्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. गावांना भरतीच्या आणि उधाणाच्या पाण्यापासून वाचवण्याकरता शेतीच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या खार बंधारे नावाखाली हा भ्रष्टाचार झालाय. या खारभूमी योजनेतून तब्बल ५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलाय. तसंच खारभूमी विभागाच्या सहा अधिकारी आणि एका ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान अशाप्रकारे बंधारा न बांधता भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माझ्याकडे आलेली नाही. अशा प्रकारची तक्रार माझ्या विभागाकडे आली तर नक्कीच या सगळ्याची चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे.























