Ratnagiri Khed : रत्नागिरीतील खेडमध्ये भूस्खलन; मुख्य रस्त्यावर दरड कोसळली
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांदरी पट्ट्यात असणाऱ्या अस्तान- धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली आहे. ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे, अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी , ही गावे देखील दरडग्रस्थ गावे असून भूस्खलना मूळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता.