एक्स्प्लोर
Konkan Railway Delays | Ganeshotsav साठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, वेळापत्रक कोलमडले
गणपती विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर चांगलाच ताण आला आहे. गाड्या चार ते पाच तास उशिराने धावत आहेत. या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावत आहेत. एका गणेश भक्ताने सांगितले की, "रत्नागिरीला सांगितलेलं बाराचं टाइमिंग, दुपारी बाराचं यायला कणकवलीला। आता अडीच तीन वाजतील असं वाटतंय।" मुंबईतून मोठ्या संख्येने कोकण रेल्वे मार्गावर गाड्या धावत आहेत. गणेश भक्तांचा प्रवास निर्धोक व्हावा यासाठी या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सध्याच्या घडीला विशेष गाड्या अडीच ते तीन तास उशिराने धावत आहेत. सकाळी धावणाऱ्या काही नियमित गाड्या देखील साधारणपणे दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत. अमोल मोरे यांनी गणेश भक्तांसोबत संवाद साधला. कॅमेरामन महेबुब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी.
रत्नागिरी
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ratnagiri Unseasonal Rain | कोकणातील भातशेती धोक्यात, कापणीयोग्य पीक वाया जाण्याची भीती
Konkan Railway Delays | Ganeshotsav साठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, वेळापत्रक कोलमडले
Bharat Gogawale : राजकारणात कधी कोण बदलेल हे सांगता येत नाही, गोगावले असं का म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























