Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
कोकणात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटला असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर आलीय... देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते.. बॅनरवरही दोन्ही नेत्यांचे फोटो होते. मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिलेत.. काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात अंतर्गत कलह सुरु आहे... भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याच सांगत विनायक राऊतांवर निशाणा साधलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केलीय.. ठाकरेंच्या मध्यस्तीनंतरह आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील संघर्ष थांबणार का हेच पाहावं लागणार आहे..























