Pune Metro | पुणे मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या दोन पुलांचं पाडकाम सुरू, दुमजली उड्डाणपूल बांधणार
पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेसाठी अडथळा येत असल्याने उड्डाणपूल पाडला जात आहे. गणेशखिंड रस्त्यावर उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सुमारे 20 दिवसांचा कालावधी अपेक्षित होता. परंतु पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरू असल्याने लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गणेशखिंड रस्त्यावरून पीएमआरडीएतर्फे या मेट्रोची उभारणी केली जाणार आहे, त्यासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल या प्रकल्पासाठी अडथळा ठरत होता. अखेर प्रशासनानाकडून हा पूल पाडण्याबात निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, दोन्ही पूल पाडल्यानंतर वाहतुकीसाठी नवा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे.























