Sushma Andhare on Drugs Case : "Excise Department ची अब्रू वेशीवर, शंभूराज देसाईंनी राजीनामा द्यावा"
Sushma Andhare on Drugs Case : "Excise Department ची अब्रू वेशीवर, शंभूराज देसाईंनी राजीनामा द्यावा" Pune Drugs News : पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आलाय. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतेय