Pune IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिम कार्यालयात बदली
Pune IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिम कार्यालयात बदली
Pooja Khedkar : ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. 32 वर्षीय पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची 2023 च्या बॅचची IAS अधिकारी आहे. भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केला आहे. दरम्यान, काल (10 जुलै) पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागिला आहे. मसुरीस्थित लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA), जे नागरी सेवा उमेदवारांना प्रशिक्षण देते, खेडकर यांच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. अकादमीचा अंतिम अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाईल.