Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये टँकरला आग , एकामागोमाग एक स्फोट, 3-4 स्कूलबस जळून खाक
रविवारी रात्री पिंपरी चिंचवडच्या ताथवडे परिसरात एका टँकरला भीषण आग लागलेली. ही आग गॅस चोरीच्या काळाबजाराने लागल्याचं धक्कादायक कारण समोर आलंय. एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या आगीत तीन ते चार स्कुलबसही जळून खाक झालेल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी पळ काढला. सध्या पोलिसांकडून टँकर चालकासह गॅस चोरट्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी























