Kasaba Election :प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात सहभागी होणार नसल्याचं Girish Bapat यांच्याकडून जाहीर
कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपात नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. आधी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची नाराजी व्यक्त केलेली असताना, आता गिरीश बापट नाराज असल्याची चर्चा रंगलीय. त्याला कारण ठरलंय, खुद्द गिरीश बापट यांचं पत्र... खासदार गिरीश बापट यांनी पत्रक काढून आपण प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय. गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाचं पाचवेळा प्रतिनिधित्व केलंय. यावेळी गिरीश बापट हे स्नुषा स्वरदा यांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते, मात्र ती मिळाली नाहीय. या पार्श्वभूमीवर बापट यांचं पत्र लक्षवेधी ठरलंय. तर दुसरीकडे माजी खासदार संजय काकडेसुद्धा प्रचारात कुठेही दिसत नाहीयत. त्यामुळे, महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरलेले असताना, भाजपसमोर या नाराजीनाट्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय.






















