CM Eknath Shinde On Pune Rain : नागरिकांनी काळजी घ्यावी, संपूर्ण यंत्रणा मदतीसाठी सज्ज : मुख्यमंत्री
CM Eknath Shinde On Pune Rain : नागरिकांनी काळजी घ्यावी, संपूर्ण यंत्रणा मदतीसाठी सज्ज : मुख्यमंत्री
पुणे: पुणे शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. तर येत्या काही तासांमध्ये पुणे शहर (Pune Rain) परिसरातील, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (Pune Rain)देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे शहराच्या सखल भागात आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे.
पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. एकता नगर परिसर, डेक्कन परिसर, निंबजनगर या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोक अडकले आहे.
पुणे महापालिकेने (Pune Rain) जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली. मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल असं उत्तर जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलं आहे.