एक्स्प्लोर

Pune Rain: पावसाचा हाहाकार! शहराला पावसाने रात्रभर झोडपलं; सिंहगड परिसरात छातीपर्यंत पाणी, अनेक जण अडकले,बोटीद्वारे बचावकार्य सुरू

Pune Rain: पुण्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे: राज्याच्या अनेक भागात पावासाचा हाहाकार दिसून येत आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांंमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुण्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आज पुण्यात पावसाचा (Pune Rain) रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.तर सिंहगड परिसरामध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. 

खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे.

मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात एकता नगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो लोक एकता नगर भागात अडकले आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. 

पुण्यात धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू

पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.हे तिघे जण अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचलं होते. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी आहेत.

पुण्यातील भिडे पूल गेला पाण्याखाली

पुण्यात (Pune Rain) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू केला आहे. काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. कॉर्पोरेशन जवळील पूल बंद होण्याची शक्यता आहे.

पुणे धरणसाठा

खडकवासला १०० टक्के
टेमघर ५७ टक्के
वरसगाव ६३ टक्के
पानशेत ७६ टक्के

लोणावळ्यात ही रेकॉर्ड ब्रेक पाऊस, पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं आवाहन

पर्यटननगरी लोणावळ्यात ही रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या चोवीस तासांत इथं 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. पावसाचा वाढता जोर पाहता, पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं, आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस बरसत आहे. काल सुद्धा तब्बल 274 मिलीमीटर पाऊस कोसळला होता. आज ही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 08 PM : 16 September 2024: ABP MajhaNana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Mahamandal : राष्ट्रवादीचा गेम? अजित पवारांच्या पक्षाला एकही महामंडळ नाही? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
Embed widget