Ravindra Dhangekar Pune : कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
Ravindra Dhangekar Pune : कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा (Diwali snacks) टेम्पो भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी अडवली आहे. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपकडून धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल भाजपने तक्रार केल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत होते. यानंतर भाजपने ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्याची माहिती पुण्याचे भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापुरकर यांनी दिली.आचारसंहितेचा भंग होत असल्याचे विद्यमान आमदारांना समजत नाही का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे. बिनदास्त तुम्ही दिवाळी फराळ वाटत आहेत. तुम्ही पडणार आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे. रविंद्र धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मार्च 2023 ला झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी ही जागा जिंकली होती. जी भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.