CBSE Board Certificate Scam : शाळांना सीबीएसई मान्यतेची बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
CBSE Board Certificate Scam : शाळांना सीबीएसई मान्यतेची बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
१२ लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना CBSE ची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय . त्यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आलाय . त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरु झालीय . मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करतायत . सोमवारी या प्रकरणात चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत. त्यामधे नक्की किती शांळानी बनावट प्रमाणपत्रे मिळवली आणि त्यामधे कोणकोण सहभागी आहेत हे समजणार आहे. संध्याकाळी पाच नंतर हा अहवाल सादर होईल.























