Sharad Pawar meeting NCP : राष्ट्रवादीत आता पुढे काय होणार? पवारांच्या घोषणेचं सखोल विश्लेषण
Sharad Pawar meeting NCP : राष्ट्रवादीत आता पुढे काय होणार? पवारांच्या घोषणेचं सखोल विश्लेषण. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलीये.. नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पवारांनी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन पर्याय ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आणि म्हणूनच, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, त्यानंतर लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.




















