Raj Thackeray Full Speech Mumbai : शिल्प कसं असावं? राज ठाकरे भरभरून बोलले
स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!
काही वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या 15 ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
राज ठाकरे यांची उपस्थिती
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी 'अस्तित्व', दुपारी 'मोरूची मावशी' तर सायंकाळी 'पुन्हा सही रे सही' या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा 4444 वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.





















