(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wadhwan Port : वाढवण बंदराला स्थानिक मच्छिमारांचा विरोध का ?
Wadhwan Port : वाढवण बंदराला स्थानिक मच्छिमारांचा विरोध का ? केंद्रीय कॅबिनेटने पालघर जिल्ह्यातील मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेला वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून जरी केंद्रीय कॅबिनेटने या बंदराला5 अखेरची मंजुरी दिली असली तरीही आमची लढाई आम्ही कायम ठेवणार असून आम्ही न्यायालयीन आणि स्थानिक पातळीवरती लढाई तीव्र करू आणि या बंदराला जसा विरोध होता तो विरोध कायम ठेवू असा इशारा येथील स्थानिकांनी दिला आहे याच विषयी स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी वाढवण बंदर उभारल्यास येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा जेएनपीएचा दावा . वाढवण बंदराच्या उभारणीमुळे देशाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याचा जेएनपीएचा दावा . वाढवण बंदर हे समुद्रात असल्याने कोणालाही विस्थापित केलं जाणार नसल्याची जेएनपीएची ग्वाही . वाढवण बंदरामुळे शंखोदराला कुठलाही धोका नसल्याचाही जेएनपीए चा दावा . वाढवण बंदरामुळे पालघरचा विकासात्मक कायापालट होणार असल्याचा जेएनपीएचा दवा वाढवण बंदरामुळे स्थानिक मच्छीमारांचा रोजगार जाणार असल्याचा स्थानिकांचा आरोप . बंदर झाल्यास जिल्ह्यातील मासेमारी कायमची नाहीशी होऊन याचा परिणाम येथील मच्छीमारावर अवलंबून असलेल्या वाढवन बंदर हजारो कुटुंबांवर होईल अशी मच्छीमारांमध्ये भीती . बंदर झाल्यास येथील जैवविविधतेवरही परिणाम होणार . वाढवण बंदरामुळे डहाणू हा हरित पट्टा प्रभावित होणार असून यामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती . वाढवण सह परिसरातील बागायतदार आणि लहान व्यावसायिक देशोधडीला लागणार असल्याचा स्थानिकांचा आरोप . वाढवण येथे प्रभू श्रीरामांच्या काळापासून असलेले शंखोदर देखील नाहीस होणार असल्याची स्थानिकांमध्ये भीती . वाढवण बंदरामुळे तारापूर अनुविद्युत केंद्राला देखील धोका पोहोचणार असल्याचा स्थानिकांचा आरोप .