एक्स्प्लोर
Kailas Patil : ठाकरे गटाचे आ. कैलास पाटील यांचं उपोषण मागे, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलं होतं आंदोलन
Kailas Patil Agitation : पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.
आणखी पाहा


















