JNPT Traffic : जेएनपीटीच्या बाहेर एक हजार कंटेनर्सची रांग ; यंत्रणा संथ, लाखोंचं नुकसान
जेएनपीटी बंदरामधून विदेशात मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात केली जाते. मात्र चार पाच दिवस झाले येथील यंत्रणेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने विदेशात जाणारे कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे कंटेनर्सची पाच ते सहा किलोमीटरची रांग लागली आहे. यामध्ये १ हजारहून अधिक कंटेनर खोळंबले आहेत. सर्वात चिंतेंची बाब म्हणजे यातील काही कंटेनर्समध्ये कांदा, अन्य भाज्या, फळं, मासे असा नाशिवंत माल आहे. हे सर्व पदार्थ थंड ठेवावे लागतात. त्यामुळे दररोज कंटेनरच्या कूलिंगवर व्यापाऱ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतायेत. तर दुसरीकडे कंटेनरचे भाडेही वाढत असल्याने निर्यातदारांना लाखोचे नुकसान सोसावे लागत आहे.