Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य
Manikrao Kokate on Ajit Pawar: मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) मधील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यावर सिन्नर (Sinnar) मधील आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar Group) यांनी सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू असं माणिकराव कोकाटे म्हणाले. एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, तसं आम्ही परवाच्या बैठकीत बोलूनही दाखवलं, रोहित पवार यांचं वक्तव्य म्हणजे, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले आहेत.
अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू : माणिकराव कोकाटे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे बोलताना म्हणाले की, "अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू, एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, अजितदादा यांना सोडून जाण्यासाठी एक तरी कारण पाहिजे, या काळात आम्ही जर अजित दादांना सोडलं, तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू."
अजित पवार यांना आमदार सोडून जाणार या सर्व बातम्या चुकीच्या : माणिकराव कोकाटे
"सिन्नरच्या विकासासाठी जेवढे पैसे अजित पवार यांनी दिले आहेत, तेवढे पैसे एकाही सरकारनं दिले नाहीत. अजित पवार यांना आमदार सोडून जाणार या सर्व बातम्या चुकीच्या आहेत, अतिशय सोयीस्कर रित्या पसरवले आहेत. परवा झालेल्या बैठकीत अजित दादा यांच्या सोबत राहण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. रोहित पवार यांचं वक्तव्य म्हणजे, राजकीय डाव असू शकतो. एकाही आमदारानं त्या अनुषंगानं माझ्यासोबत चर्चा केलेली नाही. अजित दादांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे.", असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं आहे.
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)