Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
हेही वाचा :
बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्वची जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. आता झिशान विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे. पक्ष प्रवेशावेळी झिशान थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच बाबा बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ हा एक भाग आहे. सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदार अधिक असून मराठी मध्यमवर्ग तसेच हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांचं लक्षणीय प्रमाण असल्याचे चित्र आहे. पक्ष प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी काय म्हणाले? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दिकी म्हणाले, कठिण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत . त्यांनी मला मदत केली . रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल . कांग्रेसनं अनेतवेळा संपर्क साधला, अनेक गोष्टी झाल्यात. मात्र त्यांनी ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आलाय. वरुण सरदेसाईचं आव्हान मानत नाही, जनता मला रेकाॅर्डब्रेक मतांनी जिंकवेल. झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींसाठी भावूक पोस्ट झिशान सिद्दिकींची वडील बाबा सिद्दीकींसाठी काल भावनिक पोस्ट केली. 5 वर्षापूर्वींच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यानचा फोटो शेअर करत बाबा तुमची आठवण येत असल्याचं कॅप्शन दिले. "तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते”, असं झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) हे त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत. झिशान सिद्दीकी कोण आहेत? झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.