Sanjay Raut : जलयुक्त शिवार आणि Kranti Redkar यांच्या पत्राबाबत काय म्हणाले खासदार Sanjay Raut ?
जलयुक्त शिवार योजनेबाबत क्लिनचिट देण्यात आली असं वृत्त समोर आलं होतं पण त्यानंतर आता राज्य सरकारनं स्पष्टीकरण देत या योजनेला पूर्णपणे क्लिनचिट दिली नसल्याचं म्हटलं आहे. 'जलयुक्त योजनेतील 71 टक्के कामांमध्ये आर्थिक, प्रशासकीय अनियमितता झाली आहे आणि त्याप्रकरणी चौकशी अद्यापही सुरुच आहे. जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत एसआयटीमार्फत चौकशी सुरु राहणारे आहे, त्यामुळे क्लिनचिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं आहे. या जलयुक्त शिवार योजनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत आणि आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याच बरोबर राऊत यांनी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्राबाबतही यावेळेस त्यांनी भाष्य केले.























