(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Purvesh Sarnaik Dahi Handi:9 थरांचा विश्वविक्रम संस्कृतीच्या मैदानावर झाला तसाचं 10 थरांचा इथेच होईल
Purvesh Sarnaik Dahi Handi:9 थरांचा विश्वविक्रम संस्कृतीच्या मैदानावर झाला तसाचं 10 थरांचा इथेच होईल
हेही वाचा :
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेते पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये (Harshvardhan Patil) बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधली बैठक संपल्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar)आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये (Harshvardhan Patil) बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चर्चा सुरु आहे. या भेटीवेळी राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आज दोघे चर्चा करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे. या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar)यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.