(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akbaruddin Owaisi: 'फक्त 15 मिनिटं पोलीस बाजूला करा', त्या प्रक्षोभक भाषणाबाबत अकबरुद्दिन ओवेसीं म्हणाले....
अकबरुद्दिन ओवेसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार केला. ओवेसी यांनी प्रचाराच्या त्यांच्या पहिल्या भाषणात वेळेचा उल्लेख करताना ते म्हणाले...
Akbaruddin Ovesi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये आता ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाने उडी घेतली आहे. आपल्या प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखले जाणारे MIM चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये त्यांचे प्रचाराचे पहिले भाषण केले. मुस्लिम मराठा आणि दलित मतपेढीला पाठिंबा देत मनोज जरांगे यांच्या भूमिकेची पाठराखण करत 12 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा 15 मिनिटांचा उल्लेख करत सभा गाजवल्याचं दिसतंय. त्यांच्या भाषणाने येत्या काळात राजकीय वातावरण तापणार अशी चिन्हे दिसत आहेत.
अकबरुद्दिन ओवेसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार केला. ओवेसी यांनी प्रचाराच्या त्यांच्या पहिल्या भाषणात वेळेचा उल्लेख करताना ते म्हणाले, 10 वाजताची वेळ आहे..आता 9.45 वाजतायत. अजून 15 मिनिट उरले आहेत. सभेला आलेल्या लोकांना ते म्हणाले, अरे भाई.. 15 मिनिट उरले आहेत. संयम ठेवा. ना मी त्यांचा पिच्छा सोडणार ना ते माझा सोडणार. . चल रही है मगर क्या गूंज है." असं अकबरुद्दीन म्हणाले.
बारा वर्षांपूर्वीही दिलं होतं 15 मिनिटांचं प्रक्षोभक भाषण
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी २०१२ मध्येही १५ मिनिटांचेच एक भाषण केले होते. पोलिस हटवा मग कळेल कोण ताकदवान आहे ते.. असं ते त्या सभेत म्हणाले होते.
अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले होते, हिंदुस्तानात आम्ही २५ कोटी आहोत तुम्ही १०० कोटी आहात न.. ठीक आहे. तुम्ही आमच्यापेक्षा इतके जास्त आहात. 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवू कोणाची हिंमत किती आणि कोण ताकदवान आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर केसही दाखल झाली होती. या वक्तव्यांमुळे तुरुंगातही त्यांना जावे लागले होते. कोर्टाने त्यांनंर बेनिफिट ऑफ डाऊटच्या आधारे सोडले होते.
औरंगाबाद पूर्वमध्ये 15 मिनिटांचं भाषण
भारत हा देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढी असणाऱ्या लोकांचाही आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी केले. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदुत्त्व शिकवण्यात यशस्वी झाले का? राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना सेक्युलर शिकवण्यात यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का? यांना फक्त सत्ता आणि सत्तेची गादी पाहिजे, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत बोलत होते.
असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू
AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी हे सलग 6 वेळा तेलंगणातील चंद्रयांगुट्टा येथून आमदार आहेत. एमआयएम महाराष्ट्रात 16 जागांवर निवडणुक लढवत आहे. त्यासाठी आता एमआयएमने त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. औरंगाबाद पूर्वचा प्रचार करण्यासाठी ते मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये MIM ने महाराष्टात 44 उमेदवार उभे केले होते. त्यातील दोन जागांवर ते निवडून आले होते.
हेही वाचा: