Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात पुण्यातील L3 बार ड्रग्स पार्टी प्रकरण उघडकीस आलं असताना आता मॉलमधील ड्रग्स सेवन करतानाचा नवीन व्हिडओ समोर आला. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यात नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. आता, 'पिट्या भाई' अर्थात अभिनेता रमेश परदेशीची (Ramesh Pardeshi) पोस्ट आता चर्चेत आली आहे 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल करत पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचा आरोप केला होता. आता, पुण्यात पोर्शे कार प्रकरण आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या अमली पदार्थ सेवनाच्या मुद्यावरून रमेश परदेशीची पोस्ट चर्चेत आली आहे. रमेश परदेशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, व्यसन,ड्रग्स आधी शहराच्या वेशीवर होते मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आलय. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार तुम्ही? असा प्रश्न पिट्याभाईने पुणेकरांना विचारला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
