एक्स्प्लोर

Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...

Elon Musk : अमेरिकेतील उद्योजक एलन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळं अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर झाला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू अशी ओळख एलन मस्क यांना गेल्या काही महिन्यांपासून मिळाली आहे. एलन मस्क हे टेस्लाचे मालक असून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक आहेत. एलन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. याचा फटका मस्क यांना बसला, अब्जाधीशांच्या यादीत यामुळं उलटफेर पाहायला मिळाला. एलन मस्क यांची संपत्ती एका दिवसात 22.2 अब्ज डॉलर्सनं कमी झाली. दुसरीकडे अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांच्या संपत्तीत वाढ झाली. जेफ बेजोस  हे अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर तर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर आहेत. 

एलन मस्क यांची कंपनी टेस्लाचे शेअर मंगळवारी गडगडले. वॉल स्ट्रीटवर टेस्लाच्या शेअरमध्ये 8.39 टक्क्यांची घसरण झाली. टेस्लाचं बाजारमूल्य देखील 8.39 टक्क्यांनी घसरलं. नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा टेस्लाचं बाजारमूल्य घसरलं आहे. नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा टेस्लाचं बाजारमूल्य 1 ट्रिलियन डॉलरच्या खाली आलं आहे. 

जानेवारी महिन्यात टेस्लाच्या कारमध्ये घसरण झाली आहे. यूरोपियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार टेस्लाची जानेवारीतील यूरोपमधील विक्री  45 टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, त्याचवेळी ईलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. एलन मस्कची नेटवर्थ देखील एका दिवसात घटली आहे. मस्कची नेटवर्थ 22.2 अब्ज डॉलर्सनं घसरुन 358 अब्ज डॉलर्सवर आली आली आहे. 

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. जेफ बेजोस सध्या 233 अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थ सह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत. 

फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग हे  अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. त्यांच्या संपत्तीत 3.67 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. यामुळं ते ब्लूमबर्ग बिलेनिय इंडेक्समध्ये तिसऱ्या स्थानावर घसरले. 

बर्नार्ड अर्नाल्ट चौथ्या स्थानावर

बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत 1.16 अरब डॉलर्सनं कमी झाली. मात्र, त्यांना एका स्थानाचा फायदा झाला. ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. लॅरि एलिसन एक स्थानानं खाली घसरलं. मंगळवारी एलिसन च्या संपत्तीमध्ये 2.59  अब्ज डॉलर्सची घसरण झाली. यामुळं बर्नार्ड चौथ्या स्थानावर पोहोचले. बर्नार्डकडे 192 अब्ज डॉलर्स तर एलिसनकडे 190 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी भारतात कार निर्मिती प्रकल्प सुरु करु नये असं म्हटलं होतं. मात्र, एलन मस्क भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती सुरु करु शकतात. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget