Piyush Goyal Borivali Visit : कार्यकर्त्यांकडून पियुष गोयल यांचं जोरदार स्वागत
Piyush Goyal Borivali Visit : कार्यकर्त्यांकडून पियुष गोयल यांचं जोरदार स्वागत मुंबईतल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पियुष गोयल यांनी बोरिवलीतल्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचा आज दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयांना भेट दिली. आमदार सुर्वे यांच्या दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गोयल यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत केलं. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून पियुष गोयल यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली.























