एक्स्प्लोर

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना

BMC Election 2026: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुळातच दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात  उतरले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फारसे यश मिळालेली नाही. परंतु, राज्यातील आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. यापैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election 2026) मनसे आणि ठाकरे गटात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उद्यावर येऊन ठेपली तरी मनसे (MNS) आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटप होऊन उमेदवार जाहीर होण्यास उशीर झाल्यास प्रचारासाठी कमी वेळ मिळेल. याचा फटका संबंधित उमेदवाराला बसू शकतो. हाच धोका ओळखून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना जागावाटपाची चर्चा फार लांबवू नका, असा संदेश पाठवला आहे.

सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. प्रत्येक बैठक संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागावापट होऊन मनसे आणि ठाकरे गटाची युती जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक मराठीबहुल भागांमध्ये प्रभागांच्या वाटणीवरुन शिवसेना-ठाकरे गटात रस्सीखेंच सुरु असल्याची माहिती आता समोर आली आहे. दादर, शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी या भागांमधील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे जागावाटपाची चर्चा पुढे सरकताना दिसत नाही. मात्र, या सगळ्यामुळे युतीची घोषणा आणि उमेदवारांची निवड या सगळ्यात विलंब होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जागावाटपात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक महत्त्वाची सूचना केली आहे. ज्या मराठीबहुल परिसरात जागावाटपावरुन घोडे अडले आहे, त्याबाबत जास्त रस्सीखेच करु नका, असे राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि संजय राऊत व अनिल परब यांना सांगितले आहे. यानंतर दैनिक 'सामना'च्या कार्यालयात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये संबंधित प्रभागांबाबत थेट चर्चा झाली. या चर्चेनंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी याबाबतची माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. त्यामुळे आता या प्रभागांचा तिढा राज आणि उद्धव ठाकरे कसा सोडवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबई व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget