Mumbai BMC Budget : महापालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात
Mumbai BMC Budget : महापालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा. विधानसभा आणि महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मुंबईकरांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ करण्यात येणार नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल हे सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुंबईच्या विकासात भर घालणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वर्सोवा-दहिसर सागरी सेतू, दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग आणि समुद्राचं पाणी गोड करण्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसह प्रलंबित असलेले भूमिगत मार्केट, कोळीवाडय़ांचा विकास अशा विविध प्रकल्पांवर भर दिला जाणार आहे. त्याचवेळी शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवरही या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे.