Mihir Shah Worli Hit and Run : वरळी अपघातातील आरोपी मिहीर शाहाला व्हिआयपी ट्रीटमेंट ?
Mihir Shah Worli Hit and Run : वरळी अपघातातील आरोपी मिहीर शाहाला व्हिआयपी ट्रीटमेंट ? आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah) पोलिसांकडून व्हीआयपी (VIP Treatment) ट्रिटमेंट मिळत असल्याचं दिसून येतंय. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून आरोपी मिहीर शाहाला कोर्टात आणण्यासाठी खासगी कारचा वापर करण्यात आली. कोर्ट ते जेल मिहीरची ने -आण करण्यासाठी ब्लॅक फिल्म लावलेल्या कारचा वापर पोलिसांकडून करण्यात आला. तर दुसरीकडे सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या याच पोलिसांकडून मिहीर शाहाची कोर्टात नातेवाईकांसोबत भेट घडवून दिली. कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी एका बंद खोलीत मिहीर शाहाला त्याच्या नातेवाईकांना भेटण्यास दिले.या सर्व प्रकारावरुन पोलीस मिहीरवर एवढं मेहरबान का? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान आजच्या सुनावणीदरम्यान मिहीर शाहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी आरोपी मिहिर शाहाची पोलीस कोठडी संपली. मिहीर शाहला आज न्यायालयात हजर केलं त्यानंतर मिहीर शाहाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीरने पोलिसांना दिलेला कबुलीजबाब वाचून कोठडी सुनावण्यात आली आहे . वरळी हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवले. यात 5 ते 6 प्रत्यक्षदर्शी अपघात पाहणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिहिरला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खाजगी कारचा वापर आरोपी मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खाजगी कारचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी मिहिरला कोर्टात आणण्यासाठी एरटिगा कार वापरली. काचेवर ब्लॅक फिल्म असलेली कार आरोपीला ने आण करण्यासाठी पोलिसांनी वापरली. खाजगी गाड्यांवर ब्लॅक फिल्मला बंदी आहे पण आरोपीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ही कार वापरल्याचा दावा पोलिसांना केला आहे. पोलिसांनी मिहीरच्या केसमध्ये 100 (2) , 177 हे मोटर अधिनियम कायदा कलम वाढवलं. या कलमाचा अर्थ आरोपी वापरत असलेली बीएमडब्ल्यू कारला ब्लॅक फिल्म होती.अपघातातील गाडीचा इन्श्युरन्स आणि पियूसी देखील संपल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. आज शिवडी कोर्टात पोलिसांनी काय युक्तिवाद केला? नंबर प्लेट अद्याप सापडली नाही. कोणत्या वाहनाने आरोपी फरार झाला होता तेही अद्याप समोर आलं नाही.दाढी आणि केस का कापले तेही अद्याप कळल नाही.आरोपीने लायसन्स आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांना दिलेली आहेत. घटनेनंतर आरोपी कसा फरार झाला ते अद्याप शोधायचे आहे. आम्हाला अजून काही दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज आहे.घटनेच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे आम्हाला जप्त करायचे आहेत.आतापर्यंत 27 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. बीअरच्या कॅन जप्त केलेल्या आहेत. जिथे मिहीरने केस कापले त्या सलूनच्या मालकाचा जबाब नोंदवला आहे. मिहीरच्या वकिलांचा युक्तिवाद? कारच्या मागच्या बाजूची नंबरप्लेट पोलिसांकडे आहे तर मग पुढची नंबरप्लेट घेऊन पोलीस अस काय वेगळं करणार आहेत. गाडीचा नंबर पोलिसांकडे आहे गाडी जप्त आहे. आरोपीच्या आईला आणि बहिणीला बोलावून समोरासमोर पोलिसांनी चौकशी केलेली आहे. न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. ड्रायव्हरला समोरासमोर बसवून चौकशी केलेली आहे. आता पोलीस कोठडीची गरज नाही.