Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज : ABP Majha
अवकाळी पावसानं मुंबई-ठाणे आणि आसपासच्या सर्व शहरांमधल्या गुढीपाडवा सणाच्या नियोजनावर आज पाणी फेरलं. उद्या गुढीपाडव्याच्या दिवशीही मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं पारंपरिक पोशाख करून शोभायात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणाई आणि खासकरून महिलांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. त्यासोबतच चौकाचौकात सणाचं मांगल्य वाढवणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांचं काय होणार? असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. एकंदरीत अवकाळी पावसानं गुढीपाडव्याच्या उत्साहावर किंचित का होईना, पण विरजण घातलंय. गुढीपाडव्याच्या खरेदीची लगबग सुरू असताना पावसानं अचानक हजेरी लावली. त्यामुळं अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. उद्याच्या गुढीपाडव्यावरही पावसाचं सावट आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं लोकांच्या उत्साहाची गुढी तर नक्की उभी राहील, पण ती पावसाने भिजू नये, अशी अपेक्षा मराठी मनं करतायत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
