Lalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद
हेही वाचा
Sharad Pawar at Lalbaug: शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा; भाजपच्या प्रवीण दरेकरांची आगपाखड
मुंबई: विधानसभा निवडणूक जवळ आल्याने शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि लालबागचा राजाची आठवण झाली आहे. शरद पवार यांनी लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेणे म्हणजे ढोंगीपणा आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. मध्यंतरी शरद पवार 40 वर्षांच्या खंडानंतर किल्ले रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आता 30 वर्षांनी ते पुन्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले. माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, शरद पवार (Sharad Pawar) यांना हिंदुत्त्वाबाबत सुबुद्धी मिळो, असे दरेकर यांनी म्हटले.
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे (Revti Sule) यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, ज्ञानेश्वर महाराव (Gyaneshwar Maharao) यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्त्वाचा (Hindutva) अपमान केला. त्यावर काहीही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. निवडणुकीसाठी नौटंकी का होईना पण लालबागच्या राजाने शरद पवार यांना सुबुद्धी दिली. पण महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे खोचक वक्तव्य दरेकर यांनी केले.