Ganeshotsav Mumbai:गणेशगल्लीच्या राजाला शिवराज्याभिषेकाचा देखावा,देखाव्यासाठी रायगडावरील मातीची पूजा
Ganeshotsav Mumbai Raja Dekhava : गणेशगल्लीच्या राजाला शिवराज्याभिषेकाचा देखावा, देखावा उभारण्यासाठी रायगडावरील मातीची पूजा
मुंबईतल्या गणेशगल्लीत शिवसृष्टी अवतरतेय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला पुढील वर्षी साडेतीनशे वर्ष होत असल्यानं, लालबागच्या गणेशगल्लीतही स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि शिवराज्याभिषेकाचा जिवंत देखावा उभा करण्यात येणार आहे. गणेशगल्लीतल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीबाप्पाची मुंबईचा राजा अशी ओळख आहे. मुंबईचा राजासाठी शिवराज्याभिषेकाचा देखावा साकारण्याआधी किल्ले रायगडावरच्या मातीची पूजा करण्यात आली होती. पाहूयात आमची प्रतिनिधी मनश्री पाठकचा रिपोर्ट.























