Abhishek Ghosalkar Firing Case : Uddhav Thackeray घेणार घोसाळकर कुटुंबीयांची भेट : ABP Majha
मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्थानिक गुंडाने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारीख आणि रोहित साहूला ताब्यात घेतलंय.. गोळीबाराआधी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा या दोघांकडून मेहुल पारीख नावाचा उल्लेख झाला होता. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते.अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान उद्धव ठाकरे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेणार आहेत... दरम्यान या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय.























