Independence Day 2020 | शहीद कर्नल संतोष बाबू यांचं मोझॅक पोट्रेट! गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली
74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील नितीन कांबळे या कलाकाराने तब्बल 5 हजार 544 टिकल्यांपासून शहीद कर्नल संतोष बाबू यांचं मोझॅक पोट्रेट तयार केलं आहे. हे बनवण्यासाठी नितीनने सलग तब्बल 15 तास मेहनत घेतली आहे. या पोट्रेट मध्ये नितीने 8 रंग छटांचा वापर केला आहे. याबाबत बोलताना नितीन म्हणाला की, सध्या देशात टाळेबंदी सुरू आहे त्यामुळे मी घराबाहेर न पडता घरातील पेपरच्या 5 हजार 544 टिकल्यांपासून हे पोट्रेट साकारले आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे चित्र न रेखाटता केवळ कोडींगचा वापर केला आहे. हे पोट्रेट करण्यामागे 16 जून रोजी गलवांच्या खोऱ्यात चीनी सैन्यांना यमसदनी धाडणाऱ्या आपल्या 20 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहने हा उद्देश होता. यातील प्रत्येक जवानाचे वेळेअभावी पोट्रेट तयार करणे शक्य नव्हतं. म्हणून या सर्वांचे प्रमुख शहीद कर्नल संतोष बाबू यांचे पोट्रेट काढण्याचा निर्णय घेतला. हे पोट्रेट 22 x18 इंच आकाराचे आहे.