एक्स्प्लोर
Bhaskar Jadhav | पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? : शिवसेना आमदार भास्कर जाधव
माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक विधान केले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भास्कर जाधवांचं हे विधान 8 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. 'बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे', अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नगरसेवकावर कारवाई होत नाही. पण, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते? असा सवाल देखील केला आहे. दरम्यान, एका माजी मंत्र्यानं, विद्यमान आमदारानं केलेल्या विधानाचा अर्थ काय? जबाबदार लोकप्रतिनिधीला हे विधान शोभतं का? असा सवाल सध्या जिल्ह्याच्या राजकारणात केला जात आहे. लॉकडाऊनमध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुखाला अवैध दारू विकताना पोलिसांनी पकडलं होतं. त्याचा संदर्भ घेत भास्कर जाधव यांनी हे विधान केले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत






















