Vinayak Raut On Eknath Shinde| शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने गद्दार गटाची निर्मिती केली- विनायक राऊत
Vinayak Raut On Eknath Shinde| शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने गद्दार गटाची निर्मिती केली- विनायक राऊत
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला संपविण्यासाठी गद्दार गटाची निर्मिती केली, त्या गद्दार गटाचा वापर करायचा तेवढं ते करणार नंतर फेकून देणार हे निश्चित झालेलं आहे. आणि ते सिद्ध होत आहे. आता त्यांना यांची गरज राहिलेले नाही त्यांना झुलवत ठेवायचं भिकेचा तुकडा टाकायचा आणि त्या पद्धतीने मंत्रिपदाचे जे तुकडे टाकतोय ते घ्या नाहीतर चालते व्हा. ही जी भाजपची नीती आहे ती आता त्यांना कळून चुकली आहे, आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासमोर भाजप जो तुकडा टाकेल तो चाटण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिलेला नाही. ऑन काँग्रेस राजीनामा सत्र काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये मी काही बोलणार नाही मी वाचलं विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील पराभवाला नाना पटोले यांना जबाबदार धरलेला आहे यामुळे राजीनामा देत असतील ते. ऑन सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री पद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री हा स्थानिक होणारच नाही पूर्वीप्रमाणे आयात केला जाणार आणि इथल्या कोणा एकाला जरी संधी मिळाली तरी पालकमंत्री पद इथल्या कोणाला न मिळता ते बाहेरच्यांनाच मिळणार ऑन रिफायनरी प्रमोद जठार प्रमोद जठार यांचा जीव रिफायनरीत अडकलेला आहे, शेकडो एकर जमीन जी या दलालांची आहे ना, त्या दलालांच्या हितासाठी प्रमोद जठार यांना रिफायनरी हवी आहे लोकांच्या हितासाठी नव्हे. ऑन अजित पवार आणि शरद पवार भेट शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार गेले होते एक पारिवारिक संबंध म्हणून गेले आहेत. पण यामुळे अजित पवार शरद पवार गट एकत्र येतील याची शक्यता नाही. ऑन शिंदे गट गृह मंत्री पद शिंदे गटाला सुद्धा गृहमंत्रीपद त्यांच्या आयुष्यात मिळणार नाही. भाजपच्या श्रेष्ठींकडून जी मंत्रीपदाची भीक घातली जाईल ती त्यांना झोळीत घ्यावीच लागेल ऑन मुंबई महानगरपालिका मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आम्ही शंभर टक्के तयार आहोतच, ज्याप्रमाणे मुंबईकरांनी वर्षानुवर्ष उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती मुंबई सोपवली आहे. मुंबई सुरक्षित आणि सुदृढ ठेवण्याचं काम शिवसेनेने केल आहे. हाच विश्वास पुन्हा एकदा मुंबईकर उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवतील आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिका आमच्या ताब्यात देतील असा मला विश्वास आहे. ऑन EVM बॅलेट पेपर शिवाय पर्याय नाही, पण ईव्हीएम मध्ये घपला करता येतो पण बॅलेट पेपर मध्ये करता येत नाही. म्हणून त्यांना इव्हीएम हव आहे. मागच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेल्या पोस्टल मतदानामध्ये 143 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, आणि ईव्हीएम मतमोजणी सुरू झाली त्यावेळी ते मागे गेले. ईव्हीएम हे भाजपने पोसलेलं बांडगुळ आहे. ऑन वैभव नाईक वैभव नाईक हे लढवय्या कार्यकर्ते आहेत, खचून जाणारे नाहीत, वैभव नाईक यांचा झालेला पराभव हा मेरिट वर झालेला पराभव नाही, तो गडबडीने आणि घपले बाजीने केलेला पराभव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वैभव नाईक कुडाळ मालवणचे आमदार होणार. बाईट : विनायक राऊत, माजी खासदार