एक्स्प्लोर

Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन

Aadhaar Card : मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार होती. मात्र, यूआयडीएआयनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aadhaar Update Last Date नवी दिल्ली : आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयनं मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं देशभरातील आधार कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत आज संपणार होती. 14 डिसेंबर 2024 ही आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यूआयडीएआयनं ही मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळं पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. 

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी पहिल्यांता 14 जून 2024 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देत ती तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची एक संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 

यूआयडीएआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार लाखो आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी 14 जून 2025 पर्यंत मोफत ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा कायम ठेवत असल्याचं म्हटलं आहे. ही सुविधा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असेल. यूआयडीएआय लोकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. 

ज्या लोकांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती बदलायची आहे.  त्यांच्याकडे आता 14 जून 2025 पर्यंतचा वेळ आहे. त्यामुळं मोफत आधार कार्ड अपडेटसाठी आता सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. 

ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी काय करणार? 

1. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर आधार सेल्फ सर्विस पोर्टलला भेट द्या 
2. तुमच्या मोबाइलवर  पाठवण्यात आलेल्या आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी नोंदवा
3. कागदपत्र अपडेट हा पर्याय निवडा,सध्याच्या माहितीचं परीक्षण करा 
4. ड्रॉ- डाऊन सूचीतून आवश्यक कागदपत्रांच्या प्रकाराची निवड करा, पडताळणासाठी मूळ कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करा. 
5. यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळेल, तो पुढील प्रक्रियेत फायदेशीर ठरेल. 

आधार कार्ड अपडेट करणं का आवश्यक? 

जर तुमच्या आधार कार्डच्या डेटाबेसमध्ये कोणताही बदल करायचा असेल  तर भविष्यात अडचण येऊ नये म्हणून आधार कार्ड अपडेट करुन घ्यावं. साधारणपणे लहान मुलांचं आधार कार्ड काढल्यास ते 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अपडेट करुन घ्याव, त्यानंतर पुढे वयाची  15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करणं आवश्यक आहे. बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे, आयरिस स्कॅन आणि फोटो याचा समावेश होतो. यासाठी आधार नोंदणी केंद्र आणि आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. 

इतर बातम्या :

मोठी बातमी! दागिने तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीचा आयपीओ येणार, पैसे कमवण्याची मिळणार मोठी संधी; जाणून घ्या सर्वकाही

ED कडून  JSW स्टीलची 4025 कोटींची संपत्ती परत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget