इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
England gus Atkinson : ॲटकिन्सनने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम केला जो मोडणे फार कठीण आहे. ॲटकिन्सनने जुलै 2024 मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते.
England Gus Atkinson : इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनने आपल्या घातक गोलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऍटकिन्सनने खेळाच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचे तीन बळी घेतले. यासह ॲटकिन्सनने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम केला जो मोडणे फार कठीण आहे. ॲटकिन्सनने जुलै 2024 मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले. कसोटी पदार्पणापासूनच ॲटकिन्सन या फॉरमॅटमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांसाठी धोक्याचा ठरला आहे.
Gus Atkinson has 50 Test match wickets for England! 🏴
— England Cricket (@englandcricket) December 14, 2024
REMINDER: He made his debut in July 🤯 pic.twitter.com/OdjqnxJp7U
यासह, ॲटकिन्सन कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात पदार्पणाच्या वर्षात 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ॲटकिन्सनने आतापर्यंत इंग्लंडकडून 11 कसोटी सामन्यांच्या 20 डावांत 51 बळी घेतले आहेत. या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज टेरी अल्डरमन पहिल्या स्थानावर आहे, ज्याने 1981 मध्ये पदार्पणात 10 सामन्यात 54 विकेट घेतल्या होत्या.
FIFTY. FIVE ZERO.
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) December 14, 2024
Gus Atkinson has a half century of Test match wickets in his first year - despite only playing since the summer 🤯
Oh, plus a hat-trick and a century at Lord’s. WOW. pic.twitter.com/a0Urp3BXk2
तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवीज संघाने धडाकेबाज सुरुवात केली होती, मात्र आघाडीची फळी विस्कटल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी मिळाली. न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात करताना कर्णधार टॉम लॅथमने 63 धावांची शानदार खेळी केली.
𝐆𝐔𝐒 𝐀𝐓𝐊𝐈𝐍𝐒𝐎𝐍 - 𝟓𝟎 𝐖𝐈𝐂𝐊𝐄𝐓𝐒 𝐈𝐍 𝐃𝐄𝐁𝐔𝐓 𝐘𝐄𝐀𝐑
— Richard V Isaacs (@RVICricketStats) December 14, 2024
England's Gus Atkinson has become the second Test player to reach 50 wickets in his debut calendar year, joining Australia's Terry Alderman (54 in 1981). Shoaib Bashir might join them ...#NZvEng #Atkinson pic.twitter.com/S4mgBViyUh
याशिवाय विल यंग आणि केन विल्यमसन यांनीही डाव सांभाळला. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज क्रीझवर वेळ घालवू शकला नसला तरी मिचेल सँटनरने जबाबदारी निश्चितपणे घेतली आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी नाबाद 50 धावा करून सँटनर परतला. मात्र, न्यूझीलंडसाठी शेवटची जोडी आता क्रीझवर उभी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या